उधना–जयनगर दरम्यान धावणार नवीन अनारक्षित एक्स्प्रेस; खान्देशातील प्रवाशांना दिलासा

0

उन्हाळी सुट्ट्यांमुळे देशभरातील रेल्वे मार्गांवरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने उधना–जयनगर दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. विशेष या गाडीला खान्देशातील महत्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले असून यामुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही अनारक्षित विशेष गाडी ११ एप्रिल २०२६ रोजी उधना–जयनगर दरम्यान धावणार आहे. ही गाडी उधना स्थानकातून दुपारी १.३० वाजता सुटणार असून जयनगर येथे दुसऱ्या दिवशी २.३० वाजता पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात १३ एप्रिल २०२६ रोजी जयनगर–उधना विशेष गाडी सकाळी ११.३० वाजता सुटून उधना येथे ४.१५ वाजता (बुधवार) पोहोचणार आहे.

या विशेष रेल्वे गाडीला भुसावळ, जळगाव, नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज छिवकी, पं. दीन दयाल उपाध्याय, दिलदारनगर, बक्सर, रक्सौल, समस्तीपूर, दरभंगा आदी महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळापत्रक आणि सेवांबाबत अधिकृत माहिती IRCTC आणि रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर तपासण्याचे आवाहन केले आहे. वाढत्या उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर ही विशेष रेल्वे सेवा प्रवाशांसाठी दिलासादायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.