80 वर्षाच्या ज्येष्ठांचा वाढदिवस निमित्त सत्कार व पोलीस दलामार्फत ज्येष्ठांना मार्गदर्शन
जळगाव: आधार जेष्ठ नागरिक संघात श्री.रवींद्र भैय्यासाहेब पाटील, डि.डि. पाटील,मोहन खैरनार,पंढरीनाथ साळुंखे व सचिव प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. प्रथम सर्वांचे स्वागत केल्यानंतर श्रीमती शुभांगी जोशी, सौ शांताताई वाणी,आय.एस.पाटील, कमलाकर वाणी,रघुनाथ बोरोले व विजयराव चव्हाण यांचा वाढदिवस निमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस दलाकडून आलेल्या अरविंद नारखेडे यांनी हल्ली ज्येष्ठांचे क्राईम कशा पद्धतीने घडत आहेत याबद्दल बँक खात्याविषयी लिंक वगैरे द्वारे ज्येष्ठांची बँक खात्यातून पैसे परस्पर जातात या विषयी जनजागृती करत उपाययोजना सांगितल्या.सचिव प्रकाश पाटील यांनी संघाच्या वाटचालीविषयी सखोल माहिती दिली.कॅरम बुद्धिबळ व अभ्यासिका सुरू करण्याची सांगितले.श्री. डी.डी.पाटील व मोहन खैरनार व शांताताई वाणी यांनी मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांनी ज्येष्ठांनी आनंदी जीवन कसे जगावे या विषयी माहिती देऊन वाढदिवस निमित्त ज्येष्ठाना शुभेच्छा दिल्या. डॉ भागवत निंबाळकर, विजयराव चव्हाण , शेखर पाटील , विजय पाटील,अनिल पाटील यांनी सहकार्य केले. शेवटी पंढरीनाथ साळुंखे यांनी आभार प्रदर्शन केले. चहा नाश्ता देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली


आधार जेष्ठ नागरिक संघात सौ. शांताताई वाणी व श्री कमलाकर वाणी यांचा सपत्नीक वाढदिवस निमित्त सत्कार करतांना श्री रवींद्र भैय्यासाहेब पाटील, डी.डी.पाटील, साठे ताई, वल्लभ चौधरी, मोहन खैरनार व सचिव प्रकाश पाटील..