जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाची कारवाई ; ५ कृषी केंद्रांचे परवाने केले निलंबित

0

जळगाव : बियाणे आणि खतांची साठवणूक करणाऱ्या जिल्ह्यातील ५ कृषी केंद्रांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केले आहेत. निलंबित परवानाधारकांमध्ये चोपडा तालुक्यातील २, चाळीसगाव, बोदवड व भुसावळच्या प्रत्येकी एका कृषी केंद्रचालकाचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केलेल्या तपासणीत ७ कृषी केंद्रांत गैरप्रकारासह अनियमितता आढळून आली आहे. जळगाव शहरातील एका नर्सरीची तपासणी केली असता, त्यातील औषधांसह बियाणांच्या साठ्यावरही संशय आहे. त्यामुळे या नर्सरी परवानाधारकाविरोधात सुनावणी सुरू आहे. चोपड्यातील एकाने विनापरवाना खत व बियाणांची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त तक्रारीनुसार कृषी केंद्रांची तपासणी नियमितपणे सुरू आहे. दोषी आढळलेल्या कृषी केंद्रचालकांचे परवाने निलंबित केले जात आहेत. आणखी तीन प्रकरणात सुनावणी सुरू आहे. सुनावणीनंतर कारवाईचा निर्णय घेतला जाईल.
विकास बोरसे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक

Leave A Reply

Your email address will not be published.