आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा: राज्यपाल सी पी राधाकृष्णन
पीपल्स एज्युकेशन सोसायटी चा 80 वा वर्धापन दिन सोहळा साजरा
मुंबई | अनुसूचित जातीतील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी आता गुणवत्तेवर प्रवेश तसेच नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करावा व आरक्षणाचा लाभ अनुसूचित जातीतील अधिक गरजू युवकांना घेऊ द्यावा, असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८० वा वर्धापन दिन राज्यपाल राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (दि. ८ जुलै) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पीपल्स एज्युकेश सोसायटी चे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले उपस्थित होते.
पीपल्स एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्था व वसतिगृहे निर्माण करून लाखो विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याचे कार्य करीत असल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन करताना आज अनुसूचित जातीतील अनेक विद्यार्थी आपल्या गुणवत्तेवर वैद्यकीय तसेच अभियांत्रिकी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवत असल्याचे राज्यपालांनी सांगितले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न देखील हेच होते असे सांगून आरक्षण ही विकासाची किल्ली आहे, मात्र विद्यार्थी व युवकांनी आता जागतिक स्तरावर स्पर्धेसाठी तयार राहिले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते संस्थेचे दोन माजी विद्यार्थी – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २० व्यक्तींना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार” प्रदान करण्यात आले.
थप्पड देण्याची भाषा करण्यापेक्षा मुंबई शांत ठेवा ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
मराठी आमची मातृभाषा आहे.आम्ही सर्व .मराठी आहोत.मात्र भाषेचा दुराग्रह करताना परप्रांतियांना थप्पड मारण्याची भाषा योग्य नाही. थप्पड ला थापड ने उत्तर मिळते.मात्र वाद कोणी करू नये.मुंबई शांत ठेवावी. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे.मुंबईची प्रतिमा कोणी खराब करू नये.राज्य सरकार प्रगती करीत पुढे चालले आहे.तसेच पीपल्स एज्युकेशन सोसायटी प्रगती करीत आहे.महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी चे देशभरात काम वाढत आहे असे पीपल्स एज्युकेश सोसायटी चे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले म्हणाले.
आपण पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी होतो याचा अभिमान वाटतो असे सांगून सोसायटीने आता स्वायत्त विद्यापीठ होण्याचा प्रस्ताव सादर करावा अशी सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्वायत्त विद्यापीठ झाल्यास संस्थेला नवनवीन अभ्यासक्रम राबवता करता येईल असे पाटील यांनी सांगितले.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगर ही डॉ आंबेडकर यांची कर्मभूमी होती असे सांगून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या मिलिंद महाविद्यालयाचे आपण माजी विद्यार्थी होतो असे सांगितले. आपण संस्थेच्या परिसर विकासासाठी यापूर्वीच भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून व सामाजिक न्याय विभागातर्फे राज्यात १२० तीन तारांकित विद्यार्थी वसतिगृहे निर्माण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
संस्थेचे विश्वस्त अॅड. उज्वल निकम; ॲड बी के बर्वे; यांनी देखील यावेळी उपस्थितांना संबोधित केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिन्सिपॉल यू एम मस्के यांनी केले तर संयोजन चंद्रशेखर कांबळे यांनी केले होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेते भाऊ कदम, अभिनेत्री क्रांती रेडकर, भदंत डॉ. राहुल बोधी, दक्षिण कोरिया येथील धम्मदीप भंते, बँकॉक चे उद्योजक राज वासनिक; उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर, एड. सुरेंद्र तावडे, बळीराम गायकवाड यांना देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी सौ सीमाताई आठवले; रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम; सरचिटणीस गौतम सोनवणे मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; पप्पू कागदे; काकासाहेब खांबलकर ; सौ माधुरी चंद्रशेखर कांबळे; सोना कांबळे ; नागसेन कांबळे ; सुनील सर्वगोड ; श्रीकांत भालेराव; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.